शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

कोरोनातून बरे झाल्यानंतर पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 12:13 IST

Back pain, low back pain after healing from corona : रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना पाठदुखी, कंबर व मानदुखी तसेच मांडी घालणे, शाैचास बसण्यास त्रास जाणवत असल्याचे समोर येत आहे. अशी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना विविध प्रकारच्या अन्य आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी या आजारांचाही समावेश आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर पायऱ्या चढताना व मांडी घालताना त्रास होणे, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास जाणवत असल्याचे रुग्ण पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडे येत असल्याचे दिसून येत आहे. पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांच्या आजाराला चुकीची जीवनशैली कारणीभूत ठरू पाहत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर एकाच ठिकाणी अधिक काळ बसून काम केल्यानेही अनेकांना पाठदुखी, कंबरदुचीचा त्रास जाणवत आहे. शारीरिक व्यायामाचा अभाव, बैठी व्यवस्था यामुळे पाठीच्या मणक्यांवर एकसारखा ताण पडतो. शारीरिक व्यायामाचा अभाव असल्यामुळे मणक्यांना आधार देणाऱ्या मांसपेशी कमजोर होतात. त्या पाहिजे तितका आधार मणक्यांना देऊ शकत नाहीत. त्यामुळे पाठदुखी उद्भवते. सांध्यात खराबी आल्यामुळे अर्थात ‘फॅसेट जॉइंट डिसफंक्शन’मुळेही पाठदुखी सुरू होऊ शकते. विचित्र पद्धतीने वाकल्यावर, ओझे उचलल्यावर किंवा ओढल्यावर मणक्यांमधील स्नायूंच्या पडद्याला इजा होऊन पाठ दुखू शकते. जिल्ह्यात सध्या पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. लक्षणे आढळून येताच सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.

पाठदुखी/कंबरदुखीची लक्षणेएकाच जागी दीर्घकाळ बसण्याने, पालथे झाल्याने, वजन उचलल्याने किंवा वाकण्याने वेदना वाढणेपाठीच्या वेदनांचे पायांकडे सरकणे.पायांत किंवा मांडीत झिणझिण्या आणि बधिरतेसोबत वेदना होणे,वेदनेसोबत मूत्राशय आणि आतड्यांच्या हालचालींवरील नियंत्रण सुटणेवेदनेसोबत खूप ताठरपणा येणे, ज्यामुळे बसताना, उभे असताना किंवा फिरताना अस्वस्थता येणे.

पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे. कंबर दुखणे, शाैचास बसण्यास त्रास होणे, मांडी घालणे त्रासदायक ठरणे, पायऱ्या चढताना त्रास होणे अशी लक्षणेही आढळून येत आहे. अशी लक्षणे जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. विवेक साबू, अस्थिरोगतज्ज्ञ, वाशिम

कोरोनातून बरे झालेल्या काही जणांना पायामध्ये, हातामध्ये, रक्तवाहिण्यांमध्ये गुठळ्या तयार होणे, अशी लक्षणे आढळून येतात. आजार गंभीर होऊ नये म्हणून काही त्रास जाणवताच. अशा रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. अंगावर दुखणे काढू नये.- डॉ. सुनील राठोडअस्थिरोगतज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम