शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत धोकादायक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 4:53 PM

सततच्या पावसामुळे ही ईमारत कोसळण्याची भिती असून, आरोग्य विभागाकडे या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु  (वाशिम) .:  धनज येथून जवळच असलेल्या रहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत अतिशय शिकस्त झाली आहे. सततच्या पावसामुळे ही ईमारत कोसळण्याची भिती असून, आरोग्य विभागाकडे या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठविण्यात आला; परंतु अद्यापही या गंभीर ईमारतीच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. आता येथील डॉक्टरांचीही बदली करण्यात आली असून, दवाखान्याचे कामकाजच बंद झाल्याने ग्रामीण रुग्णांची पंचाईत झाली आहे. कारंजा तालुक्यातील धनज बु. पासून जवळच असलेल्या रहाटी येथे २० वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णांवर उपचारासाठी आयुर्वेदिक दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी आणि एक परिचर अशी दोनच पदे मंजूर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून येथील परिचराचे पद रिक्त झाले असल्याने वैद्यकीय अधिकारीच रुग्णांवर उपचार करण्याचे सर्व सोपस्कार पार पाडत होते. या दवाखान्याच्या इमारतीची अवस्था खूपच गंभीर आहे. इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या तडा गेल्या आहेत. दारे, खिडक्या खिळखिळ्या झाल्याचे दिसत आहे. शौचालय, प्रसाधनगृहाची अवस्थाही गंभीर आहे. एखादवेळी वादळी वारा आल्यानंतर या दवाखान्याची इमारत कोसळून जिवित हानी होण्याची भिती आहे. आता ही ईमारत शिकस्त असल्याने दुरुस्तीची दखल घेण्यात आली नाहीच उलट. येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेव करेवाड यांचीच बदली करण्यात आली. या इमारतीच्या स्थितीबाबत त्यांनी वेळोवेळी वरिष्ठस्तरावर अहवालही पाठविला; परंतु अद्याप त्याची दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आलेली नाही.   रहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या ईमारतीची आपण स्वत: पाहणी केली आहे. ही ईमारत दुरुस्ती करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे सदर ईमारत पाडून तेथे वी ईमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आहे. त्यामुळेच येथील डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे.-डॉ. एस. आर. नांदेतालुका आरोग्य अधिकारी, कारंजा 

टॅग्स :washimवाशिम