शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! बहिणीपाठोपाठ दोन सख्खे भाऊ पोलिस दलात दाखल, गुंडी गावात घालून दिला आदर्श

By सुनील काकडे | Updated: April 15, 2023 17:41 IST

मोलमजूरी करणाऱ्या वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करायची, जनतेच्या रक्षणासाठी अंगावर खाकी वर्दी घालायचीच, या ध्येयाने झपाटलेल्या अलका गजभार हिने २०१६ मध्ये पोलिस दलात ‘एन्ट्री’ केली.

वाशिम : मोलमजूरी करणाऱ्या वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करायची, जनतेच्या रक्षणासाठी अंगावर खाकी वर्दी घालायचीच, या ध्येयाने झपाटलेल्या अलका गजभार हिने २०१६ मध्ये पोलिस दलात ‘एन्ट्री’ केली. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिच्या दोन्ही भावंडांनी देखील पोलिस भरतीचा कसून सराव केला. त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले असून दोघांचीही अकोला जिल्हा पोलिस दलात हवालदार पदावर निवड झाली आहे. तथापि, एकाच कुटूंबातील तीन भावंडांनी पोलिस दलात दाखल होत जिल्ह्यातील गुंडी (ता.मानोरा) गावात मोठा आदर्श घालून दिला आहे.

गुंडी गावातील सुभाष गजभार यांनी मोलमजूरी करून मुलांना शिक्षण दिले. मुलांनीही आई-वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करण्याचा मनोमन निर्धार केला. त्यानुसार, मैदानी निवड चाचणीची तयारी करण्यासोबतच लेखी परीक्षेचाही तिने कसून सराव केला. २०१६ मध्ये झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत यश संपादन करून तिने पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सध्या ती वाशिम जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजावत आहे.

बहिणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आकाश आणि नितीन या दोन सख्ख्या भावंडांनीही पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सामान्य ज्ञान विषयावर विशेष भर देत धावणे, गोळा फेकणे, लांबउडी, उंचउडीचा कसून सराव केला. अकोला येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत दोन्ही भाऊ सहभागी झाले. त्यात दोघांनीही चांगल्या गुणांनी मैदान मारण्यासोबतच लेखी परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. जाहीर झालेल्या अंतिम निवड यादीत दोघांचीही पोलिस दलात हवालदार पदावर निवड झाली. ही वार्ता गावात कळताच सुभाष गजभार यांच्या कुटूंबिंयासोबतच गावकऱ्यांनीही आनंदोत्सव साजरा केला.ध्येयापासून विचलित न होता मिळविले यश

सुभाष गजभार यांची मुलगी अलका हिचे २०१६ मध्ये लग्न झाले. त्यापूर्वीपासूनच ती पोलिस भरतीचा सराव करत होती. लग्नानंतरही त्यात खंड पडू न देता तिने पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तिचा भाऊ आकाश याचेही २०२० मध्ये लग्न झाले; मात्र ठरविलेल्या ध्येयापासून विचलित न होता त्यानेही रंगविलेले स्वप्न कठोर परिश्रमातून पूर्ण केले, हे विशेष.

टॅग्स :Policeपोलिस