शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीस प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 14:10 IST

वाशिम : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २४ मे ते ७ जून २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत जनजागृतीपर पंधरवडा राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देशेती करण्याच्या पद्धतीतही शेतकऱ्यांनी बदल करून भरघोष उत्पादन घ्यावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसार करण्याच्या अनुषंगाने या पंधरवड्यात जनजागृती केली जाणार आहे.मार्गदर्शन व जनजागृती करण्यावर भर  आहे, असे वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी सांगितले.

वाशिम : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २४ मे ते ७ जून २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत जनजागृतीपर पंधरवडा राबविला जाणार आहे. २४ मे रोजी या पंधरवड्यास प्रारंभ झाला.बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही शेतकऱ्यांनी बदल करून भरघोष उत्पादन घ्यावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे यासह विविध विषयांवर  ७ जून पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, अभियान, उपक्रम यांची माहिती तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धतीबाबत जनजागृती करणे, जमिनीची सुपीकता वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन, पिक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकºयांना सहभागी करून घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाºया नुकसानापासून पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे, प्रचलित योजनेचा लाभ न मिळणाºया तसेच कृषि तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसार करण्याच्या अनुषंगाने या पंधरवड्यात जनजागृती केली जाणार आहे.पिक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रति थेंब अधिक पीक या संकल्पनांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करणे, कापसावरील शेंदरी बोंड अळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे, कापसावरील शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) आणि ट्रायकोकार्डसचे महत्व व वापराबाबत जनजागृती व मार्गदर्शन,  एकात्मिक शेती पद्धती, बहुवार पीक पध्दती, आंतरपीक पद्धतीविषयी जनजागृती, कृषि संलग्न व कृषि पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकºयांचे निव्वळ आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती, नैसर्गिक आपत्तीपासून बचावात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती, कीडनाशके हाताळणी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यावर भर  आहे, असे वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती