शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बदलीपात्र शिक्षकांना आस्थापनेची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:33 IST

वाशिम:  जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेंतर्गत  जिल्ह्यातील संवर्ग १ आणि २ व ३ मधील १३९ शिक्षकांची यादी  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे; परंतु या  बदली प्रक्रियेमुळे विस्थापित होणार्‍या शिक्षकांची ऑनलाइन  अर्ज प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने बदलीपात्र शिक्षकांच्या  आस्थापनेची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, या प्रक्रियेंतर्गत  विस्थापित होणार्‍या १३९ शिक्षकांना पसंतीक्रमानुसार  ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ४ ऑक्टोबर ही शेवटची  मुदत असून, या मुदतीत अर्ज सादर करू न शकणार्‍या  शिक्षकांना शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील कुठल्याही शाळेवर  रुजू केले जाणार आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियासंवर्ग ४ साठी अर्जाची आज मुदत  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेंतर्गत  जिल्ह्यातील संवर्ग १ आणि २ व ३ मधील १३९ शिक्षकांची यादी  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे; परंतु या  बदली प्रक्रियेमुळे विस्थापित होणार्‍या शिक्षकांची ऑनलाइन  अर्ज प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने बदलीपात्र शिक्षकांच्या  आस्थापनेची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, या प्रक्रियेंतर्गत  विस्थापित होणार्‍या १३९ शिक्षकांना पसंतीक्रमानुसार  ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ४ ऑक्टोबर ही शेवटची  मुदत असून, या मुदतीत अर्ज सादर करू न शकणार्‍या  शिक्षकांना शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील कुठल्याही शाळेवर  रुजू केले जाणार आहे. राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यांतर्गत बदल्यांमधील  पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू  आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने होत आले तरी  शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अद्यापही ऑनलाइन प्रणालीत  अडकलेला आहे. या प्रक्रियेंतर्गत संवर्ग १, संवर्ग २, संवर्ग ३  आणि संवर्ग ४ अशा गटांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या  बदल्या होणार असून, जिल्ह्यातील १३९ बदलीपात्र शिक्षक  आस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने काही दिवसांपूर्वी या  बदली प्रक्रियेचे नवीन परिपत्रक काढून चालू शैक्षणिक वर्षात  विलंब झाल्याने कमीत कमी बदल्या करण्याचा निर्णय घेतला व  ३0 सप्टेंबरपयर्ंत मुदतही वाढवली होती. यानंतर वाशिम जिल्ह्या तील बदलीस पात्र असलेल्या संवर्ग १ आणि संवर्ग २ सह  अधिकार प्राप्त १३९ शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या  लॉगीनवर आली. त्यानंतर या १३९ शिक्षकांनी आपल्या पसं तीक्रमानुसार ऑनलाइन अर्जही सादर केले; परंतु या शिक्षकांच्या  आस्थापनेनंतर विस्थापित होणार्‍या १३९ शिक्षकांचे संवर्ग ४  साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने  बदलीपात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया प्रलंबित आहे. दरम्यान,  बदली पात्र शिक्षकांमधील ८३ शिक्षक संवर्ग १ मधील आणि  उर्वरित ५६ शिक्षक हे संवर्ग २, ३ आणि अधिकार प्राप्त शिक्षक  असल्याचे जि.प. शिक्षण विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून  कळले आहे. पहिल्या टप्प्यातील संवर्ग १ व २ मधील  शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संवर्ग ३ म्हणजे अवघड क्षेत्र  तसेच संवर्ग ४ मधील शिक्षकांच्या बदल्या होणार असून, या  गटांमधील शिक्षकांना ४ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीपर्यंत अर्ज  करण्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रक्रि येंतर्गत  उच्च न्यायालयात दाखल याचिकेची सुनावणी अद्याप व्हायची  आहे. 

संवर्ग ४ साठी शिक्षकांना २0 गावांचा पसंतीक्रमजिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेंतर्गत संवर्ग १, २ आणि अधिकार प्राप्त मिळून १३९ शिक्षकांच्या नियुक्ती किंवा आस्थापनेसाठी  १३९ इतर शिक्षकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. आता या  विस्थापित होणार्‍या शिक्षकांनाही त्यांना सोयीचे असलेले गाव  मिळावे म्हणून २0 गावांचा पसंतीक्रम देण्यात आला आहे. या  अंतर्गत संबंधित शिक्षकांना मुख्याध्यापकांच्या लॉगीनवर  ऑनलाइन अर्ज करताना गावांची यादी दिसणार आहे.  त्यामधील २0 गावे निवडून पसंतीक्रमानुसार ती अर्जात नमूद  करावी लागणार आहेत. यानंतर शिक्षकांच्या पसंतीनुसार आणि  रिक्त असलेल्या गावांचा प्राधाण्यक्रमाने विचार करून शासनस् तरावरूनच बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे.