शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:14 IST

चार प्रशासकीय कर्मचाºयांना निलंबित; तर चार कंत्राटी कर्मचाºयांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली; मात्र संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत ब्राम्हणवाडा (ता.मालेगाव) येथे करण्यात आलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी दाखल तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी १३ जून २०१९ रोजी मालेगाव गटविकास अधिकारी व तहसीलदारांची समिती स्थापन करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. असे असताना तो आदेश पायदळी तुडवत दोषींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. जिल्हा परिषदेने याच प्रकरणात ४ शासकीय कर्मचारी निलंबित, ४ कंत्राटी कर्मचाºयांना कार्यमुक्त करून तत्कालिन गटविकास अधिकाºयाची विभागीय चौकशी प्रस्तावित केली, हे विशेष.मालेगाव पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी संदिप कोटकर यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता झाली. नाला सरळीकरण, शेततळे निर्मिती, वृक्ष लागवड कामांची मजूरांकडून मागणी नसतानाही चुकीच्या पद्धतीने तथा बोगस मजूर दाखवून परस्पर मस्टर काढणे, प्रस्तावित आराखड्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात नाला सरळीकरणाची कामे सुरू करून शासकीय निधीचा अपव्यय करणे, अल्पवयीन मुलांना मजूर दाखवून त्यांच्या नावे जॉबकार्ड तयार करणे यासह इतरही गंभीर स्वरूपातील घोटाळे झाले आहेत. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील गोपिनाथ शिवाजी नागरे यांनी २७ मार्च २०१९ आणि २८ मे २०१९ असे दोनवेळा ब्राम्हणवाडा येथे रोहयोच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. त्याची दखल घेवून जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी १३ जून २०१९ च्या पत्रान्वये मालेगावचे विद्यमान तहसीलदार आणि गटविकास अधिकाºयांची समिती स्थापन करून ब्राम्हणवाडा येथील कामांची चौकशी करून दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी व त्याचा अहवाल ७ दिवसांत पाठवावा, असे स्पष्ट आदेश दिले होते; मात्र त्याचे पालन अद्यापपर्यंत झाले नाही.यादरम्यान विभागीय आयुक्तांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेवून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार मालेगाव तहसीलदारांकडून सीईओंना प्राप्त झालेल्या अहवालात दोष सिद्ध झाल्याने चार प्रशासकीय कर्मचाºयांना निलंबित; तर चार कंत्राटी कर्मचाºयांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली; मात्र संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. ब्राम्हणवाडा येथे रोहयोच्या कामांमध्ये घोटाळा करणाºयांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्याचे पालन मात्र अद्यापपर्यंत झालेले नाही. यासंदर्भात मालेगाव तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना जाब विचारण्यात आला असून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- शैलेश हिंंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम ब्राम्हणवाडा येथील रोहयो घोटाळा प्रकरणासंबंधी १३ जून रोजी पारित झालेले जिल्हाधिकाºयांचे पत्र प्राप्त झाले असून त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाईल. याप्रकरणी दोषींवर निश्चितपणे गुन्हे दाखल होतीलच.- रवि काळेतहसीलदार, मालेगाव