शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

स्त्रीभ्रूण हत्या टाळा; स्त्री जन्माचे स्वागत करा! - प्रियंका गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:44 IST

Washim News वाशिमच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुलगा-मुलगी असा भेदभाव नको, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र बहुतांश पालकांची मुलीपेक्षा मुलालाच अधिक पसंती असते. यामुळेच स्त्री- पुरूष लिंगगुणोत्तर विषम असून, दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. स्त्री- पुरूष लिंगगुणोत्तरातील दरी कमी करणे आणि कन्येच्या सन्मानार्थ ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत देशात यंदापासून आंतरराष्ट्रीय बालिका दिन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत स्त्री- पुरूष लिंगगुणोत्तर प्रमाण, स्त्री भ्रूण हत्या टाळणे, शासनाच्या विविध योजना यासंदर्भात वाशिमच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद. स्त्री भ्रूण हत्या टाळून स्त्री जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तराचे प्रमाण कसे आहे?स्त्री- पुरूष लिंगगुणोत्तराचे प्रमाण विषम असून, स्त्री जन्मदर वाढावा याकरीता प्रत्येकाने स्त्री भ्रूण हत्या टाळावी, स्त्री जन्माचे स्वागत करावे, मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता मुलींनाही समान मानले तर निश्चितच स्त्री- पुरूष लिंगगुणोत्तरातील दरी कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

मुलीचा जन्मदर वाढावा याकरीता प्रशासनातर्फेजनजागृती केली जाते का?बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानांतर्गत स्त्री जन्माचे स्वागत हा उपक्रम राबविण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा उद्देश हा बालिकांचा जन्मदर वाढविणे आणि त्यांना सशक्त बनवणे असा आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फेदर महिन्याला मुलीला जन्म देणाºया मातेचा सत्कार केला जातो. माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणाºया पालकास मुलीच्या नावे बँकेत विहित रक्कम जमा केले जाते.

स्त्री भ्रूण हत्येबाबत काय सांगाल ?स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी शासनाने  विविध कायदे अंमलात आणले. त्याची प्रभावी अंमबलजावणीदेखील होत असल्याने पूर्वीच्या तुलनेत अलिकडच्या काळात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. पालकांनीदेखील मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये.

बालिका दिन कशाप्रकारे साजरा करणार?बालिका दिनाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत मुलींच्या जन्माचे स्वागत, स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा प्रयत्न आणि मुलीलाही समान दर्जा मिळावा यासाठी ११ आॅक्टोबर रोजी प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. रथाद्वारे वाशिम शहरात जनजागृती, बेटी बचाओ-बेटी पढाओ संदर्भात स्टिकर्सचे वाटप, रांगोळीतून मुलगी वाचवा, मुलीला शिकवा हा संदेश दिला जाणार आहे. १७० अंगणवाडी केंद्रात जनजागृती केली जाईल.

पुरूषप्रधान संस्कृतीत बालिका, महिलादेखील प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे. दुसरीकडे महिला सक्षमीकरणातही बालिका, महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. किशोरवयीन मुलींमध्ये आत्मबळ वाढविण्यासाठी प्रबोधनपर सत्राचे आयोजन केले आहे. स्त्रियांचे शारीरिक व मानसिक बळ वाढविणे, स्त्री सक्षमीकरणासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कटिबद्ध आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत