शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; १३ लाख रुपये केले परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:30 IST

Auditing of private hospitals in Washim : वाशिम शहरातील २२ रुग्णालयांचे ऑडिट करणे सुरू आहे; तर सेक्युरा हाॅस्पिटलला ५७१ रुग्णांचे पैसे परत करण्याचा आदेश देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अति तीव्र ठरली. यादरम्यान रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी भरती झालेल्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावे, यासाठी कमाल दर मर्यादा निश्चित करण्यात आली. त्यानुषंगाने खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी २० ऑडिटर्सची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधितांकडून आता वाशिम शहरातील २२ रुग्णालयांचे ऑडिट करणे सुरू आहे; तर सेक्युरा हाॅस्पिटलला ५७१ रुग्णांचे पैसे परत करण्याचा आदेश देण्यात आला असून, या हाॅस्पिटलने आतापर्यंत ३२५ रुग्णांचे १३ लाख ४२ हजार ३०० रुपये परत केले आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यासंबंधी शासनस्तरावर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर भरारी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार, वाशिम शहरातील २२ रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या देयकांवर लक्ष ठेवले जात आहे. सदर रुग्णालयांमध्ये दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी करणे व विहित दरानुसार दर आकारणी केली जाते किंवा नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पथक प्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे. दरम्यान, आतापर्यंत वाशिममधील एकमेव सेक्युरा हाॅस्पिटलच्या तपासणीत ५७१ रुग्णांच्या देयकात त्रुटी आढळून आल्या.दरम्यान, आतापर्यंत वाशिममधील एकमेव सेक्युरा हाॅस्पिटलच्या तपासणीत ५७१ रुग्णांच्या देयकात त्रुटी आढळून आल्या.

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून खासगी कोविड हाॅस्पिटलकडून कोरोना बाधितांकडून आकारण्यात आलेल्या देयकांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वी पहिल्या लाटेत झालेल्या तपासणीदरम्यान सेक्युरा हाॅस्पिटलने आकारलेल्या देयकांमध्ये त्रुटी आढळून आल्या. ५७१ जणांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.- शन्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या