शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ‘आॅडिट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:16 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे.

ठळक मुद्दे हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यापूर्वीच १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे. दुबार अनुदान लाटणाºयांकडून अनुदान वसूलीची कार्यवाही केली जाणार आहे.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. ३१ मार्च२०१८ पूर्वी जिल्हा हगणदरीमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल ठेवणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने त्यापूर्वीच १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठले होते. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र लाभार्थीला १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. दरम्यान, काही लाभार्थींनी  शौचालय असूनही, स्थानिक पातळीवर संगनमताने पुन्हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेतल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर परिसरासह या सर्कलमध्येही काही जणांनी शौचालय बांधकाम न करताच प्रोत्साहनपर १२ हजार रुपयांचे अनुदान लाटल्याची तक्रार झाली होती. काही जणांनी शौचालयाचे अर्धवट बांधकाम करून १२ हजार रुपयांचे अनुदान लाटल्याचे प्रकरणही समोर आले होते. रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी प्रत्यक्ष दिलेल्या भेटीदरम्यानही हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मालेगाव तालुक्यातही स्थानिक पातळीवर दोन ठिकाणी संगनमताने शौचालय अनुदान हडपल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी दोघांकडूनही प्रत्येकी १२ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद