शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वाशिम जिल्ह्यातील १९0 संस्थांचा ऑडीटला ‘खो’

By admin | Updated: August 6, 2016 02:10 IST

२५0 संस्थांचे लेखा परिक्षण अहवाल प्राप्त : १९0 संस्थांना नोटीस जारी.

संतोष वानखडे वाशिम, दि. ५ : वाशिम जिल्ह्यातील एकूण ७७0 सहकारी संस्थांपैकी ५८0 संस्थांनी मुदतीच्या आत लेखा परीक्षण केले तर उर्वरीत १९0 सहकारी संस्थांनी ह्यऑडिटह्णला खो दिला. ऑडिट पूर्ण न करणार्‍या सहकारी संस्थांबाबत अपराध दंडाची नोटीस पाठविण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी तालुका निबंधकांना दिले.जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण ३१ जुलैपर्यंत करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. ७७0 सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाची जबाबदारी एकूण ३२ अधिकार्‍यांवर सोपविली होती. चार सनदी लेखापालांकडे १४ संस्था, १८ प्रमाणिक लेखा परीक्षकांकडे ५२२ संस्था आणि १0 शासकीय लेखा परीक्षकांकडे २३४ संस्थांच्या लेखा परीक्षणाची जबाबदारी दिली होती. ३१ जुलैपयर्ंत किती संस्थांचे लेखा परीक्षण झाले याबाबतची माहिती घेतली असता, ७७0 पैकी ५८0 संस्थांचे सन २0१५-१६ चे लेखा परीक्षण कामकाज पूर्ण झाले असून, जवळपास २५0 संस्थांचे लेखा परीक्षण अहवाल प्राप्त असल्याची माहिती मिळाली. २३0 संस्थांचे लेखा परीक्षण अहवाल दोन आठवड्यात अथवा सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिद्ध करण्यापूर्वी सादर करण्याची हमी लेखा परीक्षकांनी दिली आहे. १९0 सहकारी संस्थांनी लेखा परीक्षण केले नसल्याने या संस्थांबाबत अपराध दंडाची नोटीस जारी करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी तालुका निबंधकांना दिले आहेत. सन २0१४-१५ चे दोष दुरूस्ती अहवाल वेळेत सादर न करणार्‍या संस्थांबाबत व शेरे नोंदवून सादर न करणार्‍या लेखा परीक्षकांबाबतदेखील दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा खाडे यांनी दिला आहे. दोन लेखापरीक्षकांची नावे हटविण्याचा अहवालसहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील लेखापरीक्षकांच्या पॅनेलवर असलेल्या विवेक दाभाडे व जे. एस. कापसे या प्रमाणित लेखापरीक्षकांची नावे नामतालिकेवरून कमी करण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्तांना तत्काळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी दिली. वाशिम जिल्ह्यात ४0 लेखापरीक्षक कार्यरत सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणाकरिता वाशिम जिल्ह्यातील जवळपास ४0 लेखापरीक्षक कार्यरत आहेत. एक लाख रुपयांपेक्षा अधिक भागभांडवल असणार्‍या एकूण २0 पेक्षा अधिक संस्थांचे लेखापरीक्षण लेखा परीक्षक स्वीकारणार नाही, असा नियम आहे. शासन नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवून उपरोक्त दोन लेखापरीक्षकांची नावे नामतालिकेवरून कमी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाणार असल्याचे खाडे यांनी सांगितले.