शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक प्रचारामुळे ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:49 IST

मालेगाव  :  सद्याच्या होत असलेल्या निवडणुका व त्यातील हायटेक प्रचारामुळे दोन पिढयांपासून करीत असलेल्या ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा लागली असल्याची खंत येथील कलाकार विजय सावंत यांनी व्यक्त केली.

- अरुण बळीमालेगाव  :  सद्याच्या होत असलेल्या निवडणुका व त्यातील हायटेक प्रचारामुळे दोन पिढयांपासून करीत असलेल्या ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा लागली असल्याची खंत येथील कलाकार विजय सावंत यांनी व्यक्त केली.कोणतीही निवडणूक असली की पूर्वी माझ्या घरी, दुकानांवर मोठया प्रमाणात उमेदवारांचे प्रतिनिधी ‘वेटींग’वर राहायचे. आज अशी घडी आली आहे की, कोणी साधे विचारायला सुध्दा येत नाही. त्यामुळे आॅडिओ क्लिप तयार करुन देण्याचा व्यवसाय केवळ शहरात लागलेले सेल्स, नगरपंचायतच्यावतिने गावात देण्यात येणाºया सुचनेपुरताच मर्यादित राहिला असल्याची माहिती दोन पिढयांपासून आॅडियो क्लिप तयार करुन देण्याºया विजय सावंत यांनी दिली.मालेगाव शहरातील विजय सावंत यांच्या दोन पिढयांपासून कोणतीही निवडणूक आली की उमेदवारांच्या आॅडियो क्लिप तयार करुन देण्याचा व्यवसाय आहे. याआधी उमेदवारांच्या प्रतिनिधींना आपल्याकडे वेळ  नाही म्हणून अकोला, अमरावती येथील कलांकारांजवळ पाठवावे लागत होते. आजच्या घडीला तेथील कलाकारांना विचारणा केली असता सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याचे दिसून आले. आॅडिओ क्लिप तयार करण्याचा धंदा दोन पिड्यापासून चालत आलेला आहे . त्या काळात आँडिओ क्लिप व्दारेच प्रचार होत असल्याने निवडणूकीच्या १५ दिवसाआधी पासून नंबर लागत होते,  तर चांगला आवाजाच्या कलाकारांना अकोला किवा वाशिम वरून बोलविला जाते होते. त्यामुळे कलाकाराना चांगलीच कमाई होत होती,  परंतू आताचा हायटेक प्रचारामुळे दोन पिढ्याचा व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. व उदरनिवार्हाचा प्रश्न उभा राहिला आहे . 

वेगवेगळीे गाणी वेगवेगली युक्ता वापरून आॅडिओ क्लिप तयार केली जात असल्याने त्यामुळे मतदारचे मनोरंजन , प्रबोधन ,  साध्या व सरळ  भाषेत असल्याने त्याचा प्ररिणाम अधिक दिसून येत होता.  सत्ताधारी यांनी केलेल्या कामाची महती तर विरोधकांनी त्यावर केलेला टिका यामुळे प्रचारात चागलांच कलगीतुरा रगंत होते. तसेच इतरापेक्षा आपली आॅडिओ क्लिप सरस असली पाहिजे यासाठी चागला आवाजाचा कलाकारांना किमंत त्या वेळी  मिळत होती व त्यावरच त्या कलाकारंचा उदरनिर्वाह चालत होता. परंतू हायटेक प्रचारामुळे अनेक कलाकार पडद्याच्या आड गेले.

टॅग्स :washimवाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक