शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाली मेडशी आठवडी बाजारातील ओट्यांची हर्रासी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:43 IST

मेडशी (वाशिम) : आठवडी बाजारातील ओट्यांची दरवर्षी हर्रासी केली जाते. त्यानुसार, यंदाही हर्रासी घेण्यात आली; परंतु ती ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

ठळक मुद्देमेडशी येथे आठवडी बाजारातील ओट्यांच्या हर्रासीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रशासकीय अधिकाऱ्याविना बाजारातील ओट्यांची हर्रासी होणे, ही ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.

मेडशी (वाशिम) : आठवडी बाजारातील ओट्यांची दरवर्षी हर्रासी केली जाते. त्यानुसार, यंदाही हर्रासी घेण्यात आली; परंतु ती ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मेडशी येथे आठवडी बाजारातील ओट्यांच्या हर्रासीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. असे असताना सरपंचांच्या उपस्थितीत; पण प्रशासकीय अधिकाऱ्याविना बाजारातील ओट्यांची हर्रासी होणे, ही ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.हर्रासीमध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी आठवडी बाजारात सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, हा प्रश्न व्यावसायिकांनीच त्यांच्या स्तरावर सोडवावा, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, बाजारातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासकीय अधिकारी ही समस्या निकाली काढण्याकामी उदासिनता बाळगत असल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिकांकडून अनामत रक्कम स्विकारणे, हर्रासीमधील अटी व शर्ती व्यावसायिकांना समजावून सांगणे, ही जबाबदारी ग्रामसेवकाची असल्याने आठवडी बाजारातील ओट्यांच्या हर्रासी प्रक्रियेत त्यांनी हजर राहणे आवश्यक होते. याबाबत चौकशी केली जाईल.- व्ही.आर. येनकर, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव