शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

 निवडणुक आटोपली, आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 12:07 IST

Gram Panchayat Election जिल्हाधिकाऱ्यांकडून आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केव्हा होते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, आता सरपंच पदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर एका महिन्याच्या आत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढणे बंधनकारक असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केव्हा होते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.  जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. दरवेळी निवडणुकीपूर्वी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत होती. यंदादेखील आरक्षण सोडत काढण्यात आली; परंतु त्यानंतर ग्रामविकास विभागाने ही सोडत रद्द करीत निवडणुकीनंतर आरक्षण सोडत काढण्याचे जाहीर केले होते. निकालानंतर एका महिन्याच्या आत  सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. १८ जानेवारी रोजी निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दरम्यान, सरपंच पद मिळावे म्हणून इच्छुकांनी पॅनल व आघाडी प्रमुखांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.  काही जण म्हणतात, पूर्वीचेच आरक्षण राहावे !निवडणुकीपूर्वी सरपंच पदासाठी जिल्हा स्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आरक्षणानुसार अनेकांनी सरपंच पदावर डोळा ठेवून निवडणुकीची तयारी केली; मात्र अल्पावधीतच आरक्षण सोडत रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. ‘रोटेशन’ पद्धतीने आरक्षण सोडत निघत असल्याने अनेक ठिकाणी पूर्वीचेच आरक्षण कायम राहील, असा दावा काहींनी केला तर आरक्षण सोडतीत बदल होईल, असा अंदाज काहींनी वर्तविला.

निवडणूक निकालानंतर एका महिन्याच्या आत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढावी, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.- सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच