शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या धाकावर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 16:00 IST

एटीएमचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी (वाशिम) : बंदुकीच्या धाकावर अज्ञात चोरट्यांनी मेडशी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न १९ मार्चच्या रात्री १.३० वाजतादरम्यान केला. एटीएमचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला.येथे अकोला-हिंगोली राष्ट्रीय महामार्गाला लागून सेन्ट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. एटीएमवरील वाचमन निलेश सतीश घुगे(२५) याने फिर्याद दिली की रात्री १.३० वाजताच्या सुमारास एटीएमच्या बाहेरून एका अज्ञात इसमाने आवाज दिला की त्याला एटीमएमधून पैसे काढायचे आहेत. एटीएमचे शटर उघडले असता, एका अज्ञात इसमाने त्याच्यावर बंदूक धरली आणि दोन इसम हे गॅस कटरच्या साहायाने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत होते. ेवढ्यात एटीएमचा सायरन वाजला. हा आवाज ऐकून त्या तिघांनी तेथून पळ काढला. सायरन वाजल्याने सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयाला या धटनेची माहिती मिळताच तातडीने वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. यावरून अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, मालेगाव ठाणेदार आधारसिंग सोनुने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बनसोडे, सायबर सेल पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रवीण खंदारे,स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल मोडकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंवी कलम ३०७, ३४२, ३७९, ५११, ३४ सहकलम ४/२५ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेºयात चोरटे कैद झाले असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बनसोडे, पोलीस गजानन टाले करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी