शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर आकारणीच्या तक्रारींचा ‘आॅन दी स्पॉट’ होणार निपटारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 13:22 IST

वाशिम : ग्रामपंचायत स्तरावरील मालमत्ता कर आकारणी व नमुना आठ यासंदर्भात नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर दर तीन महिन्यांतून एकदा संनियंत्रण समितीने आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिले.

ठळक मुद्दे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तीन महिन्यांनी किमान एक बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या सर्व बाबींवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे नियंत्रण राहणार आहे.

वाशिम : ग्रामपंचायत स्तरावरील मालमत्ता कर आकारणी व नमुना आठ यासंदर्भात नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर दर तीन महिन्यांतून एकदा संनियंत्रण समितीने आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिले.गावाच्या सीमेलगत इमारती व जमिनीवर कर बसविण्याचा अधिकार ग्रामपंचायतला असून, भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारणी करण्याच्या सूचना शासन स्तरावरून आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १२४ (५) व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये मालमत्ता कर आकारणीविषयक अपिलाच्या तरतुदी आहेत. तथापि, चुकीची कर आकारणी किंवा नमुना नंबर आठला चुकीच्या नोंदी झाल्याने संबंधित नागरिकांकडून तक्रार करण्यात येतात. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन वादही निर्माण होतात. न्यायालयीन वाद टाळून तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्याच्या अनुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कर आकारणी समितीच्या कामकाजावर संनियंत्रण ठेवणे, कर आकारणीमध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे आणि कर आकारणी समितीस साहाय्य करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर संनियंत्रण समिती गठित करण्यात आलेली आहे. कर आकारणी, नमुना आठ नोंदीसंदर्भात प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी या संनियंत्रण समितीने दर तीन महिन्यांनी किमान एक बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या बैठकीत तक्रारदाराला आमंत्रित करून सदर प्रकरणी नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या सर्व बाबींवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे नियंत्रण राहणार आहे.शासन निर्णयानुसार, ग्रामपंचायत स्तरावरील मालमत्ता कर आकारणी व नमुना आठ यासंदर्भात नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

 

टॅग्स :washimवाशिमGovernmentसरकार