शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
2
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
3
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
6
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
7
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
8
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
9
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
10
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
11
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
12
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
14
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
15
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
16
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
17
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
18
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
19
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
20
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका

कायाकल्प अभियानात आसेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिम जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 14:30 IST

वाशिम: राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कायाकल्प अभियानात वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांनी पुरस्कार पटकावले आहेत.

ठळक मुद्दे मंगरुळपीर तालुक्यातील दोन, तर रिसोड आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एका आरोग्य केंद्राचा समावेश आहे.प्रथम पुरस्काराबद्दल आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला २ लाख, तर इतर आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० रुपये पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आले.२७ हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाºयांवर आहे.

वाशिम: राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कायाकल्प अभियानात वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांनी पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील दोन, तर रिसोड आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एका आरोग्य केंद्राचा समावेश आहे. त्यामध्ये आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार पटकावला आहे. 

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गत महिन्यात राज्यभरात कायाकल्प अभियान राबविले. या मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रांची पाहणी केली. त्यामध्ये स्वच्छतेसह जनतेशी निगडित सोयीसुविधांचे सुक्ष्म निरीक्षण त्यांच्याकडून करण्यात आले. यात वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्र पुरस्कारासाठी पात्र ठरले. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम, मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने दुसरा, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राने तिसरा, तर रिसोड तालुक्यातील केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने चौथा क्रमांक पटकावला. प्रथम पुरस्काराबद्दल आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला २ लाख, तर इतर आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० रुपये पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना या कामगिरीसाठी रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, आसेगाव केंद्रांतर्गत २७ गावे समाविष्ट असून, या गावांतील २७ हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाºयांवर आहे. आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत. त्यांनी कायाकल्प अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली. कायाकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातून मिळालेला प्रथम पुरस्कार चंद्रकांत ठाकरे यांच्याहस्ते आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप नव्हाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश सुर्वे, डॉ स्नेहल जाधव,  देवराव महल्ले, पंचायत समिती सदस्य वनिता चव्हाण, श्रध्दा शेळके, अनंत शेळके, मनवर खान, भारत खडसे, सरपंच गजानन निंबाजी मनवर, विष्णू चव्हाण, बळवंत मोकळे, मुदस्सिर खान, शेख इरफान, शेख मुफीद, डॉ. शौकत खान, फिरोज शहा, जावेद पटेल, गोपाल संगेकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगावमधील सर्व कर्मचाºयांची उपस्थिती होती.  

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर