शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आसेगावातील जनतेला १४ दिवसांत एकदा होतो पाणी पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 19:05 IST

अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअल्प जलसाठा व भारनियमनाचा परिणामविहिरी, कूपनलिकांची पातळी गेली खोल 

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): यंदाच्या अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तीन प्रभागातील जनतेला तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गावातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खोल गेल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. आसेगाव येथे तीन प्रभागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी १४ पाईप लाईन आहेत. यातील एका लाईनमधून पाणी सोडल्यास दुसºया लाईनमधून पाणी पुरवठा करण्यासाठी १४ दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरी आणि कूपनलिका, हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे; परंतु विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी होत आहेत. यंदा अपुरा पाऊस पडल्याने जलसाठे आटले आहेत. त्यातच महावितरणकडून १४ तास भारनियमन करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा योजनेतही अडथळे येत आहेत. एका हातपंपावर ४० ते ५० कुटंबांची भांडी ओळीने पाणी भरण्यासाठी लावून ठेवावी लागतात. त्यात हातपंपात साचलेले पाणी संपले की पुन्हा पाणी साचण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने नियोजन करून जनतेला पाणी पुरवठा करावा आणि महावितरणनेही भारनियमन शिथील करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. 

टॅग्स :Waterपाणी