रिसोड : रिसोड पोलीस स्टेशनच्या कोठडीत २0११ साली झालेल्या एका आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी आणि एका कर्मचार्यास गुरूवारी रात्री ९.३0 वाजता सीआयडीच्या पथकाने अटक केली. रिसोड पोलिस ठाण्यात २0११ साली एका प्रकरणात आरोपी असलेल्या लालेश पडगीलवार याचा कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक किरण साळवे आणि पोलीस कर्मचारी लक्ष्मण केंद्रे यांच्याविरुद्ध कलम ३0४ , २१७, ११८, २0१, ३0२, ३८५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते.तब्बल ५ वर्षानंतर सावळे आणि केंद्रे या दोघांना अटक करण्यात आली. सध्या साळवे हे जउळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत.दोघांनाही वैद्यकीय तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. या कारवाईमध्ये सीआयडीचे अधिकारी सुधाकर पठारे, सी.पी. पाटील, शेख शरीफ, सतीश राजपुत, विनोद मार्केडे, सुनिल पवार, अमोल उमाळे, मोहम्मद हाफीज यांचा समावेश आहे.
पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलीस अधिका-यास अटक
By admin | Updated: March 4, 2016 02:16 IST