पिंपळगाव येथे कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी सभेचे आयोजन केले. या सभेत एमआरईजीएसअंतर्गत फळबाग लागवड, नाडेप, कंपोस्ट खत युनिट, महाडीबीटी, स्प्रिंकलर, तुषार, तूर व सोयाबीन कीड व रोग व कृषी विभागाच्या इतर योजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर यांनी केले. या सभेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सभेनंतर गणेश सोनाजी निर्गुडे यांच्या शेतात पपई लागवड, पेरू लागवड, सीताफळ लागवडीबाबत माहिती दिली, तसेच सुभाष भुसारी यांच्या शेतातील हळद व तूर नवीन वाण व सोयाबीनच्या जेएस ९३-०५ व जेएस ३३५ या वाणांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता पिंपळगावचे नवनियुक्त कृषी सहायक के. एस. मुंडे, कृषी पर्यवेक्षक एस. पी. चवरे, कृषी पर्यवेक्षक नागरगोजे व मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर उपस्थित होते.
---------
घरगुती बियाण्यांवर भर देण्याचे आवाहन
पिंपळगाव डाकबंगला येथे कृषी विभागाच्या चमूने शेतकऱ्यांना एमआरईजीएसअंतर्गत फळबाग लागवडीसह कृषी योजनांबाबत मार्गदर्शन करतानाच सोयाबीन पेरणीसाठी पुढील वर्षी घरगुती बियाणे वापरण्यावर भर देण्याचे आवाहन केले. यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे संवर्धनांसाठी विजातीय सोयाबीन झाडे काढून बियाणे शुद्ध करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.