शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटणार; पाणीटंचाईचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:53 IST

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत.

ठळक मुद्देयंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे.गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी किंवा लागवड झाली होती. प्रशासनानेही शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत. त्यातच प्रशासनानेही शेतकºयांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ८४ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही मानोरा, वाशिम आणि मंगरुळपीर या तीन तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे साहजिकच प्रकल्पांत अल्प जलसाठा उरला आणि भूगर्भातील पाणी पातळीवरही अल्प पावसाचा परिणाम झाला. अल्प पावसामुळे रब्बी पिकांचे उत्पादन घटत असल्याचे हरभºयाच्या काढणीतून दिसत आहे. अशात उन्हाळ्यात भुईमूग, मका आणि तिळासह गतवर्षात वाढलेली टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची  पेरणी किंवा लागवड झाली होती. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीच्या तुलनेत गतवर्षी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती. अर्थात गतवर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे शेतकºयांनी हे धाडस केले होते. तथापि, यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटण्याची भिती कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रकल्पातील साठा आरक्षीत करण्यासह विहिरी आणि कुपनलिकांचे अधिग्रहण करण्याचे ठरविले असून, शेतकºयांना उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती