शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

टाळ-मृदंगाच्या गजरात माकडावर अंत्यसंस्कार!

By admin | Updated: June 10, 2017 02:15 IST

माणुसकीचा प्रत्यय; राजुरा ग्रामस्थांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम ): आजारी अवस्थेतील माकडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ८ जून रोजी राजुरा येथे घडली. यावेळी गावकर्‍यांनी माणुसकीचा प्रत्यय देत चक्क टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून माकडावर अंत्यसंस्कार केले. गावाला टँकरने पाणीपुरवठा करणारे शे. रहीम शे. गबरू यांना रिधोरा ते राजुरा मार्गावर एक माकड आजारी अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी आपले वाहने उभे करून पादचारींच्या मद तीने माकडाला राजुरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात भरती केले. तेथे सदर माकडावर पशुधन पर्यवेक्षक डॉ. सतीश देवळे, कर्मचारी जगदीश सोनोने यांनी उपचार करून माकडाला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. उपचारादरम्यान माकडाचा मृत्यू झाला. ही बाब गावकर्‍यांना कळताच युवा मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष नागेश गावंडे यांनी पुढाकार घेत माकडावर विधिवत अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला. विठ्ठल महाराज सोनोने, गजानन महाराज टोंचर, झ्याटे महाराज यांनी टाळ आणि मृदंगाच्या गजरात माकडाची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पाडले. यावेळी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.