शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के जमीन संपादित करा! -समृद्धी महामार्गाबाबत शासनाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 15:05 IST

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या  भुसंपादनाच्या कामास सद्या चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी एकंदरित ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.त्यामुळेच २६ मार्चपर्यंत भुसंपादनाची टक्केवारी ७० टक्क्यांच्या वर पोहचली होती.३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश तालुका पातळीवर देण्यात आले आहेत.

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या  भुसंपादनाच्या कामास सद्या चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विविध स्वरूपातील अडचणीत सापडलेल्या जमिनींचा अपवाद वगळता किमान ८० टक्के भुसंपादन येत्या ३१ मार्च २०१८ च्या आत करण्यात यावे, असे निर्देश शासनाने स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार, अधिकारी, कर्मचारी जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यानुषंगाने तालुका उपनिबंधक कार्यालयांवर शेतकºयांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी एकंदरित ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. दरम्यान, शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने बाजारभावाच्या पाचपट मोबदला देवून सरळ खरेदी पद्धतीने जमिनी संपादित करण्याचा निर्धार केल्याने शेतकºयांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच २६ मार्चपर्यंत भुसंपादनाची टक्केवारी ७० टक्क्यांच्या वर पोहचली होती. आगामी सहा दिवसांत हे प्रमाण वाढवून ३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश तालुका पातळीवर कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकामी जोमाने भिडल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग