शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात नियम डावलून घरकुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:17 IST

आसोला खुर्द: रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवत नियमांना डावलून पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजूर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देमानोरा तालुक्यात रमाई घरकूल योजना राबविण्यात येत असून, शेकडो कुटूंबांनी या योजनेंतर्गत अर्ज सादर केले आहेत. या अर्जानुसार पाहणी करून पात्र लाभार्थींना घरकूल मंजूर करणे आवश्यक आहे.या योजनेत नियमांना बगल देऊन खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

आसोला खुर्द: रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवत नियमांना डावलून पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजूर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. पंचायत समिती प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करावी, तसेच पात्र लाभार्थींना घरकूल मंजुर करावे, अशी मागणी आसोला खुर्द येथील ग्रामस्थांनी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे  निवेदनाद्वारे केली आहे. या तक्रारीची दखल न घेतल्यास 31 मार्चपासून उपोषण करण्याचा ईशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.  

मानोरा तालुक्यात रमाई घरकूल योजना राबविण्यात येत असून, शेकडो कुटूंबांनी या योजनेंतर्गत अर्ज सादर केले आहेत. या अर्जानुसार पाहणी करून पात्र लाभार्थींना घरकूल मंजूर करणे आवश्यक आहे; परंतु या योजनेत नियमांना बगल देऊन खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी गटविकास गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. यात आसोला खुर्द येथील अर्जदारांचाही समावेश आहे. आसोला खुर्दसाठी रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; परंतु त्यामधील काही घरकुलांना अद्यापही मंजुरी मिळालेली नसून, काही ठिकाणी पक्की घरे असणाºयांना घरकूल मंजुर करण्यात आली असल्याचे गटविकास अधिकाºयांकडे केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची प्रत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां कडेही पाठविण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यां नी सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि नियमांना बगल देणाºयांवर कारवाई करण्यासह पात्र लाभार्थींना न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थींच्यावतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाManoraमानोराpanchayat samitiपंचायत समिती