शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या वापरासाठी दक्षता अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 17:47 IST

लोकमतने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ मे रोजी ‘अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचीच दक्षता नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हास्तरावरून तालुकास्तरापर्यंच्या कार्यालयांत मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या.  

ठळक मुद्देशासनाने ७ मे रोजी नव्याने परिपत्रक जारी करून मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश सर्व शासकीय कार्यालयांना दिलेत.परंतु जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांत शासन परिपत्रकाला आठवडा उलटूनही नियुक्त्यांची दक्षता घेण्यात आली नव्हती. लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हास्तरावरून तालुकास्तरापर्यंच्या कार्यालयांत मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या.  

वाशिम : शासन, प्रशासनाच्या कामकाजात मराठीचा वापर करण्यासाठी राज्य शासनाने ७ मे रोजी नव्याने परिपत्रक जारी करून सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजात मराठीच्या वापराची पडताळणी करण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही शासनाने दिले; परंतु शासनाच्या परिपत्रकाला आठवडा उलटल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयात दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नव्हती. या संदर्भात लोकमतने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ मे रोजी ‘अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचीच दक्षता नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हास्तरावरून तालुकास्तरापर्यंच्या कार्यालयांत मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या.  महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा आंगीकार करण्यात आला. तसेच सदर अधिनियमांतर्गत महाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम १९६६, ३० एप्र्रिल, १९६६ च्या अधिसूचनेन्वये अंमलात आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच १ मे १९८५ पर्यंत वर्जित प्रयोजने वगळता संपूर्ण शासकीय कामकाज मराठी भाषेतून करावे, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. तथापि, अद्यापही शासकीय कार्यालयांत मराठी भाषेचा वापर १०० टक्के केला जात नसल्याने, शासनाने ७ मे रोजी नव्याने परिपत्रक जारी करून मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश सर्व शासकीय कार्यालयांना दिलेत. यासाठी मराठी भाषा समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. त्याशिवाय शासकीय कार्यालयांत मराठीच्या वापराची पाहणी करण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही शासनाने दिले होते; परंतु जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांत शासन परिपत्रकाला आठवडा उलटूनही नियुक्त्यांची दक्षता घेण्यात आली नव्हती. या पृष्ठभूमीवर लोकमतने १६ मे रोजी अधिकाºयांच्या नियुक्तीचीच दक्षता नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर विविध शासकीय कार्यालयांत मराठी भाषा दक्षता अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा मुख्यालयांसह तालुकास्तरावर या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विविध विभागांतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांमधूनच एका अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया कार्यालयांत जिल्हास्तरावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची, तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे, तर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया कार्यालयात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या कार्यालय अधिक्षकांकडे आणि तालुकास्तरावर निवासी नायब तहसीलदारांकडे मराठी भाषा दक्षता अधिकाºयांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय