यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनुजा अनंत मुसळे या विद्यार्थिनीने वाशिम जिल्ह्याचा संपूर्ण देशात नावलौकिक केला आहे.
दिवंगत समाजकल्याण अधिकारी अनंत मुसळे यांची कन्या अनुजा मुसळे हिने यूपीएससीची परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण केली आहे. वडिलांच्या अपघाती निधनाने मानसिक तणावाखाली असूनही जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या अनुजाच्या यशाचा सर्व जिल्हावासीय आनंद व्यक्त करत विविध संस्था, संघटना व मान्यवर तिचा सत्कार करीत आहेत. शहरातील माजी आमदार विजयराव जाधव, ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव धाडवे, शिवशंकर भोयर, धनंजय हेंद्रे, राहुल तुपसांडे, नीलेश जयस्वाल, धनंजय रनखांब, विश्वास ब्रम्हेकर, डॉ. जे. एस. जांभरूणकर, डॉ. मंजुश्री जांभरूणकर यांनी शनिवारी अनुजाचा सत्कार केला. याप्रसंगी अनुजा हिची आई छाया अनंत मुसळे, भाऊ अथर्व मुसळे तसेच काका श्रीनिवास मुसळे, ॲड. महेश महामुने व भागवत गोटे उपस्थित होते.