जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. गुरुवारी एका जणाला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मालेगाव तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७१३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१० सक्रिय रुग्ण
गुरुवारच्या अहवालानुसार नवीन एक रुग्ण आढळून आला, तर एकाने कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १० रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
0000000000000
पाच तालुके निरंक
गुरुवारच्या अहवालानुसार मालेगाव शहरात एक रुग्ण आढळून आला. उर्वरित कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही.