शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  ३४ नवे ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 11:30 IST

Washim CoronaVirus News एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आणखी ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. दरम्यान, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, ४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत घट आली होती. डिसेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. सोमवारी एकूण ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १, बागवानपुरा येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जाधव ले-आऊट येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, अनसिंग येथील ३, उकळीपेन येथील २, मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. येथील १, सुदी येथील १, पांगरखेडा येथील १, एकांबा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, रिठद येथील १, मोप येथील १, भर येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील चहल येथील १, कासोळा येथील १, वसंतवाडी येथील १, कारंजा शहरातील सनराईज कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मनभा येथील १, शिवनगर येथील १, पोहा येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादासनगर येथील २, रोहणा येथील १, करपा येथील २, शेंदूरजना येथील १, गोस्ता येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,४४७  वर पोहोचला आहे. सोमवारी ६ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. दरम्यान, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे १४८ जणांचा मृत्यू झाला.   नागरिकांनी यापुढेही खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

२६१ जणांवर उपचार जिल्ह्यात आतापर्यंत ६,४४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,०३७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी  कोविड हॉस्पिटल येथे २६१ अक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या