शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; १६६ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

गत १६ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कारंजा येथील ७३ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात ...

गत १६ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कारंजा येथील ७३ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली, तर आणखी १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ३, अल्लाडा प्लॉट येथील २, लाखाळा येथील १, राधाकृष्ण नगर येथील ३, नालंदा नगर येथील १, पुसद नाका परिसरातील २, गणेशनगर येथील १, एसीबी ऑफिस परिसरातील १, ब्रह्मा १, झाकलवाडी येथील १, तामसी १, वरुड १, रिसोड शहरातील ३, घोटा येथील २, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १०, वसंतनगर येथील ५, मंगरूळपीर शहरातील १३, बोरवा १, मोहरी २, बेलखेड येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, कोळंबी येथील १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील ३, वरुड येथील १, कासोळा येथील १, शेंदूरजना येथील २, वनोजा येथील १, कारंजा शहरातील ४५, पसरणी येथील ९, अनाई येथील १, रामनगर येथील २, कामठवाडा येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, पोहा येथील ६, वाल्हई येथील २, यावर्डी येथील २, वडगाव रेंगे येथील १, कामरगाव येथील २, बेंबळा फाटा येथील १, मोऱ्हाळ येथील २, वढवी येथील १, महागाव येथील १, धनज येथील १, हिंगणवाडी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, सुकळी येथील १, दिघी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा ९,२३६ वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७,६८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले.

००

१३८९ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ९,२३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७,६८५ जणांनी कोरोनावर मात केली, तर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १३८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.