गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी आणखी ११२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील नवीन आययूडीपी येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ३, टिळक चौक येथील १, आययूडीपी १, टेलिफोन वसाहत परिसरातील २, अकोला नाका परिसरातील १, शास्त्री कॉलनी १, लाखाळा १, पार्डी आसरा १, दगड उमरा ३, अनसिंग १, राजगाव १, कारंजा शहरातील संतोषी मातानगर १, तुषार कॉलनी १, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव ५, नरेगाव येथील ६, कामठा येथील १, टाकली बु. येथील १, शहा येथील २, येवता येथील २, उंबर्डा येथील ४, विळेगाव येथील ९, वाई येथील ४, हिंगणवाडी येथील १२, बेंबळा येथील १, टाकळी खु. येथील १, खंडाळा येथील १, धनज खुर्द येथील १, कुऱ्हाड येथील १, बांबर्डा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, जांब रोड येथील १, चेहलपुरा येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, लाठी येथील ६, नवीन सोनखास येथील १, कोठारी येथील ४, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील १, दापुरी येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, पोहरादेवी येथील २, गिरोली येथील १, हिवरा बु. येथील १, वसंतनगर येथील १, सोयजना येथील १, साखरडोह येथील २, वाईगौळ येथील १, धावंडा येथील १, रिसोड शहरातील शिवाजीनगर येथील १, आनंद चौक येथील १, गोभणी येथील १, मांगवाडी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली असून, १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आता कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १० हजार ४७० वर पोहोचला असून, यापैकी ९,००८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. आतपर्यंत १६३ जणांचा मृत्यू झाला.
०००
१,२९८ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत १०,४७० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ९,००८ जणांनी कोरोनावर मात केली, तर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १,२९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
०