शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो, कामावर रुजू व्हा; १८७९ सेविका, मदतनीसांना नोटीस

By दिनेश पठाडे | Updated: January 10, 2024 13:29 IST

मागण्या पूर्ण होईपर्यंत रुजू न होण्याचा पवित्रा; ३३६ अंगणवाडीत पोषण आहार वाटप सुरु

दिनेश पठाडे, वाशिम : शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचारी संघटनानी केला आहे. ३६ दिवसांपासून अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे पोषण आहार प्रभावित झाला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सहा बाल विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत १८७९ ग्रामीण अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह इतर  विविध मागण्या  राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक लंबित आहेत. याबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली. पण, चर्चा आणि आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत.

नागपूर येथील  हिवाळी अधिवेशनावर देखील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. अजूनही संपावर तोडगा निघाला नसल्याची स्थिती आहे. शहरी आणि ग्रामीण मिळून ११७६ अंगणवाडी केंद्रांतील पोषण आहारही प्रभावित झाला.  यावर तोडगा म्हणून महिला बचत गट, शाळा, रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत अंगणवाडीतील बालकांना सकस पोषण आहार देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे पोषण आहार, गरोदर माता तपासणी, कुपोषण मुलांचा आहार, लहान मुलांची शिकवणी, विविध योजनांची अंमलबजावणी अशा अनेक बाबी प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कामावर तत्काळ रुजू व्हावे, अन्यथा नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे. जिल्ह्यातील(ग्रामीण) ९४८ अंगणवाडी सेविका व ९३१ मदतनिसांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जि.प.महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली.किती नोटीस, किती रुजू (ग्रामीण)अंगणवाडी सेविका-९४८मदतनीस-९३१कामावर रुजू सेविका-४रुजू  मदतनीस-६४

टॅग्स :washimवाशिम