शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पावसातही वाशिममधील प्राचीन गाव तलाव कोरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 16:35 IST

वाशिम शहरातील पाणी पातळीत वाढ होऊन पाणीसमस्या दूर व्हावी, या उद्देशाने गतवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या पुढाकारासह लोकसहभागातून शहरातील प्राचीन गाव तलावाचे खोलीकरण करण्यात आले.  मात्र यंदा अपु-या पावसामुळे अद्यापही त्यामध्ये किंचितही जलसाठा वाढलेला नाही. 

वाशिम (मंगरुळपीर), दि. 9 - शहरातील पाणी पातळीत वाढ होऊन पाणीसमस्या दूर व्हावी, या उद्देशाने गतवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या पुढाकारासह लोकसहभागातून शहरातील प्राचीन गाव तलावाचे खोलीकरण करण्यात आले. गतवर्षीच्या पावसामुळे काठोकाठ भरलेला हा तलाव उन्हाळ्यात आटला आणि आता यंदा अपु-या पावसामुळे अद्यापही त्यामध्ये किंचितही जलसाठा वाढलेला नाही. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गाव तलावाची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. हा तलाव बुजत चालला होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी  आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने लोकसहभागातून या तलावाचे खोलीकरण केले. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर आलेल्या पावसामुळे हा तलाव काठोकाठ भरला आणि गावातील विहिरी व हातपंपांची पातळी वाढल्यामुळे या तलावाच्या खोलीकरणाचा उद्देश सफल झाल्याचे दिसले. त्यानंतर सचिन कुळकणी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी या तलावाची सुरक्षा आणि सौंदर्यीकरणाची गरज लक्षात घेऊन त्या संदर्भात जिल्हा प्रशासनमार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव मांडला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या तलावाचे सौंदर्यीकरण आणि सुरक्षेसाठी कुंपण बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला; परंतु त्या निधीतून अद्याप या तलावाचे सौंदर्यीकरण किंवा कुंपणभिंतीचे कामही करण्यात आले नाही. त्यातच यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे अर्धा पावसाळा उलटला तरी, हा तलाव कोरडा ठाक आहे. आता येत्या काही दिवसांत जोरदार वृष्टी झाली, तरच हा तलाव भरण्याची शक्यता आहे.