शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत बांधणी योजनेत अमरावती विभाग उपेक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:10 IST

अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.

ठळक मुद्दे३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायतीया तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेत एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी दुसऱ्या टप्यात ५४ ग्रामपंचायतीची व निवड झाली आहे. यात अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कायालयाची इमारत बांधण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ २३ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आली अहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता, त्यासाठी ऊपलब्ध असणाºया स्तोत्रांची मर्यादा विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ३०२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यामध्ये अमरावती विभागातील एक हजार लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या ४० ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यात बुलडाणा जिल्ह्यातील १६, यवतमाळ जिल्ह्यातील १२, अकोला जिल्ह्यातील ७, वाशिम जिल्ह्यातील ३ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. आता दुसºया टप्प्यात ३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अमरावती विभागाच्या ५ जिल्ह्यातून केवळ तीन ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यात अमरावती जिल्ह्यातील २ आणि अकोला जिल्ह्यातील केवळ एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विभागातील यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायती अस्तिवात असून, या ग्रामपंचायतींचा कारभार हा जिल्हा परिषद शाळा, सामाजिक सभागृहे किंवा भाड्याच्या जागेतून चालविण्यात येतो; परंतु या तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत