शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाची रक्कम बँकेत पडून !

By admin | Updated: May 23, 2017 17:55 IST

समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास हंगामही धोक्यात

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असला तरी रोकड तुटवड्यामुळे मंजूर पीक कर्जाची रक्कम बँकेतून "विड्रॉल" करणे अशक्य ठरत आहे. परिणामी, ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून या समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास हंगामही धोक्यात सापडणार असल्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे. यंदा जिल्ह्यातील १.५ लाख शेतकऱ्यांसाठी ११५० कोटी रुपये कर्ज वितरणाची तरतूद करण्यात आली. काही शेतकऱ्यांना कर्ज मंजूर देखील झाले. कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, तो पैसा ह्यएटीएमह्णमधून काढावा लागत असून बँकांकडे एटीएममध्ये टाकण्यास पुरेशी रक्कमच नसल्याने शेतकरी आणि बँकांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेला या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सद्या खरीप हंगामासाठी बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध बँकांचे एकूण १ लाख ९८ हजार ५४० शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख ६२ खातेदार पिककर्जासाठी पात्र आहेत. यावर्षी सर्व  बँका मिळून ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वितरित करणार आहेत. पिककर्जाची रक्कम रोखीने न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जपुरवठा करणारी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या ह्यरूपे केसीसीह्ण कार्डवर पैसे जमा करीत आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या एटीएममधून काढावी लागते आणि एटीएममध्ये टाकण्यासाठी बँकेकडे पुरेसे पैसेही नाहीत. बँकेच्या वाशिम येथील मुख्य शाखेला त्यांच्या दिवसभराच्या व्यवहारासाठी १० लाख रुपये मिळतात. यातील काही रक्कम त्यांना एटीएममध्ये टाकावी लागते. त्यातच त्यांच्या एटीएममध्ये केवळ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाच टाकणे शक्य असून, त्यांना स्टेट बँकेकडून मिळणाऱ्या १० लाखाच्या रकमेत सर्वच नोटांचे कमी अधिक प्रमाण असते. हीच स्थिती इतरही बँकांची असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर जाणवत असल्याचे दिसत आहे.