शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाचे असेही ‘वेड’; एक लाख बियांचे संकलन! निसर्गप्रेमी युवकाचा प्रवास

By नंदकिशोर नारे | Updated: January 29, 2023 10:51 IST

डाेक्यात पर्यावरण संवर्धनाचा विचार... मनात वृक्ष संवर्धनाची तळमळ... अशा निसर्गप्रेमी युवकाने चक्क जंगलात वेळ, काळ न पाहता भटकंती करत चक्क ७४ प्रकारच्या १ लाख बिया गाेळा केल्या. 

- नंदकिशाेर नारे वाशिम : डाेक्यात पर्यावरण संवर्धनाचा विचार... मनात वृक्ष संवर्धनाची तळमळ... अशा निसर्गप्रेमी युवकाने चक्क जंगलात वेळ, काळ न पाहता भटकंती करत चक्क ७४ प्रकारच्या १ लाख बिया गाेळा केल्या. संकलित बियांचे मागेल त्याला माेफत वितरण सुरू केले. सीड्स बाॅलची निर्मिती, राेपे तयार करण्याचे प्रशिक्षणही देत लाेकजागराचे व्रत त्याने हाती घेतले आहे. पर्यावरण संवर्धनाचे ‘वेड’ असणाऱ्या या युवकाचे नाव आहे निखिल चव्हाण.

स्पर्धा परीक्षेची करतोय तयारीn मानाेरा तालुक्यातील माहुली येथील रहिवासी निसर्गप्रेमी निखिल चव्हाण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. फावल्या वेळात ताे जंगलात रात्री-बेरात्री, पहाटे उठून जाऊन विविध प्रकारच्या बियांचे संकलन करून पावसाळ्यात या बिया वन, जंगल परिसरात फेकून वृक्षाराेपण करत आहे. n तसेच सीड्स बॉल, बीज संकलन, रोपे तयार करणे या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करण्याचे कार्यही त्याच्या हातून घडत आहे. आपल्याकडे विदेशी झाडांची संख्या जास्त आहे. n यामध्ये गुलमोहर, सप्तपर्णी, रेन ट्री यासारखी झाडे लावली जात आहेत.  या झाडांचा पर्यावरणाला कसल्याही प्रकारचा फायदा नसल्याने याऐवजी देशी झाडे लावली जावीत व त्याचा फायदा जैवविविधतेला व्हावा, हाच उद्देश समाेर ठेवून कार्य हाती घेतल्याचे निखिल सांगतो.

मागेल त्याला बीज देताे माेफत निसर्गमित्र निखिल चव्हाण याने वाशिम जिल्ह्यात, परिसरात जंगल, डोंगर फिरून  आंबा, फणस, चिंच, पळस, आपटा, बाबूळ, काटेसावर, सागवान, अर्जुन कडुनिंब, हिवर, बेहडा, सीताफळ, रामफळ, बेलपत्री, करंजी, चारोळू, बहावा, रिठा, पांगारा, कठव, जांब, जाभूळ, आवळा, मोह, शेवगा, बकुळ, भोकर आदी प्रकारच्या बिया जमा केल्या.  मागेल त्याला मोफत दिल्या व काहींची रोपे तयार करून मोफत देत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव