शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अगोदरच विलंब; त्यातही विहिर बांधकामांचे कार्यारंभ आदेश मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ) : सन २०१८-१९ या वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रशासकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : सन २०१८-१९ या वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रशासकीय दिरंगाई आणि पदाधिकाºयांच्या डावपेचात अडकली आहे. एका महिन्यापूर्वी ईश्वरचिठ्ठीतून निवड झालेल्या लाभार्थींना अद्याप विहिर बांधकामासंदर्भात कार्यारंभ आदेश मिळाले नसल्याने ३१ मार्च २०१९ पूर्वी बांधकाम पूर्ण कसे करावे, असा प्रश्न लाभार्थींना गटविकास अधिकाºयांकडे उपस्थित केला आहे.अनु. जाती तसेच अनु. जमातीलमधील शेतकºयांचे जीवनदान उंचाविण्यासाठी  डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. सन २०१८-१९ या वर्षात या योजनेंतर्गत लाभार्थींची निवड प्रक्रिया प्रचंड दिरंगाईने राबविण्यात आली. डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या सभागृहात ईश्वर चिठ्ठीतून लाभार्थींची निवड झाल्यानंतर तातडीने कार्यारंभ आदेश मिळणे पात्र लाभार्थींना अपेक्षीत होते. मात्र, अद्याप कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी विहिर बांधकाम पूर्ण कसे करावे, या विचाराने शेतकºयांची झोप उडाली आहे. ईश्वर चिठ्ठीतून निवड झाल्यानंतरही लाभार्थी निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने यामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप लाभार्थींनी केला. मागासवर्गीय शेतकºयांच्या योजनेत व्यत्यय निर्माण करून ही योजना रखडविली जात असल्याचा आरोपही होत आहे. या पृष्ठभूमीवर निवड झालेल्या लाभार्थींना विहिर बांधकाम सुरू करण्यासंदर्भात तातडीने आदेश देण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारिप-बहुजन महासंघ शाखा रिसोड तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांनी २८ जानेवारी रोजी गटविकास अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे दिला. मागासवर्गीय शेतकºयांवर अन्याय होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांसह भारिप-बमसंच्या पदाधिकाºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड