मानोरा : कृषी विभागामार्फत तालुक्यातील कारखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी तुरीचे बियाणे ईश्वर चिठ्ठीने वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत केवळ २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन किलो तुर बियाण्याचे मोफत वाटप करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, २५ पेक्षा जास्त शेतकरी असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठी टाकुन बालकाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यामधुन केवळ २५ शेतकऱ्यांना तुरीचे मोफत बियाणे वाटण्यात आले. यावेळी सरपंच भानु जाधव, उपसरपंच जयश्री गणेश बावणे, कृषी सहाय्यक फुके, मसाळ, कोतवाल विजय काजळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
ईश्वर चिठ्ठीने ‘तूर’ बियाण्याचे वाटप
By admin | Updated: June 21, 2017 13:49 IST