शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अडाण प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले; शंभर टक्के साठा: प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग

By नंदकिशोर नारे | Updated: September 26, 2023 15:38 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला आहे.

वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे नियंत्रण असलेला यवतमाळ पाटबंधारे विभाग सतर्क झाला असून, मंगळवारी सकाळपासूनच या प्रकल्पाचे पाचही दरवाजे प्रत्येकी ५ सेंटीमिटरने उघडून त्यातून प्रति सेकंद ३०.४३ घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

अडाण हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे सनियंत्रण यवतमाळ पाटबंधारे विभागांतर्गत येते. मागील तीन दिवसांपासून या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने प्रकल्पाच्या साठ्यात वाढ होत आहे. गत १५ जुलै आणि २२ जुलै रोजीही या प्रकल्पात साठा वाढल्याने या धरणाचे पाचही उघडून २० विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी या प्रकल्पात १०० टक्के साठा झाल्याने पाचही दरवाजे ५ सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. या पाचही दरवाजातून प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग करण्यात येत होता.तर विसर्ग आणखी वाढविणार

अडाण प्रकल्पात अचानक साठा वाढल्याने पाटबंधारे विभागाने पातळी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे पाचही दरवाजे मंगळवारीरी सकाळीच प्रत्येकी ७० सेंटीमिटरने उघडत त्यातून प्रति सेेकंद ३०.४३ घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरू केला. तथापि, जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच आहे. यामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.परिस्थितीवर यवतमाळ पाटबंधारे विभागाचे लक्ष

अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अडाण नदीला पूर येऊन प्रकल्पातील पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अशात धोक्याच्या पातळीपर्यंत पाणीसाठा वाढू नये म्हणून यवतमाळ पाटबंधारे विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी पाटबंधारे विभागाचे सहअभियंता प्रकल्पावर तळ ठोकून बसले आहेत.