शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमात शौचालय बांधकामसंदर्भात लोककलावंतांचा ‘गजर’ ! चिमुकल्यांचाही सहभाग : विशेष कुटुंब संपर्क अभियान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:26 IST

गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला.

वाशिम: गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंतांनी केले.वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी तसेच नागरिकांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. लोटाबहाद्दरांविरूद्ध दंडात्मक कारवाई करतानाच, नागरिकांची मानसिकता बदलविण्यासाठी लोककलावंतांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या व हगणदरीमुक्त घोषित न झालेल्या गावांत प्रत्येक कुटुंबांशी संवाद साधता यावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून विशेष कुटुंब संपर्क अभियान राबविले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिसोड तालुक्यातील चिखली, व्याड, रिठद या गावांना भेटी देण्यात आल्या. शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी भेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शौचालय नसलेल्या कुटुंबाच्या घरावर लाल रंगाचे (खतरा/धोका) स्टिकर लावण्यात आले. संबंधित कुटुंबाकडून शौचालय बांधकाम करण्याचे आश्वासन घेण्यात आले. शिरपूर जैन येथेही जनजागृती करण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी येथे लोककलावंतांच्या माध्यमातून गजर करण्यात आला. चिमुकल्यांनीदेखील विविध घोषणा देत शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी सहभागी झाले असून, गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेने नागरिकांना केले.