शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:38 IST

वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नॉन रेड झोनमध्ये समावेश झाल्याने जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. परंतू, वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने मजूर, कामगार येत असून, दक्षता म्हणून अनेक व्यापारी दुपारी ३ वाजतानंतर दुकाने बंद ठेवत असल्याचे २५ मे रोजी दिसून आले.वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत दुपारी २ वाजेपर्यंत विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यानंतर हळूहळू गर्दी ओसरत असल्याचे २५ मे रोजी दिसून आले. दुपारी ३ ते ३.३० वाजतानंतर पाटणी चौकस्थित बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद करण्यात येतात. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो.मालेगाव : राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. दरम्यान, अर्थचक्र थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न म्हणून राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना २१ मे रोजी जारी केल्या. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असली तरी दुपारी २ वाजतानंतर मालेगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. तापते ऊन आणि कोरोना संसर्गाचा धोका यामुळे व्यापारी दुपारनंतर दुकाने बंद ठेवत असल्याने बाजारपेठेत सामसूम दिसून आली.केनवड : सकाळी ९ वाजतापासून केनवड येथील बसथांब्यावरील दुकानांमध्ये गर्दी दिसून येते. दुपारी २ ते ३ वाजतानंतर बहुतांश दुकाने बंद केली जातात. त्यामुळे दुपारनंतर शुकशुकाट दिसून येतो. २५ मे रोजीदेखील केनवड येथील बाजारपेठेत दुपारी  ३ वाजतानंतर शुकशुकाट दिसून आला.शिरपूर जैन : येथे २२ मे पासूनच दुपारी ३ वाजतानंतर सर्व बाजारपेठ बंद होत आहे. २५ मे रोजीदेखील शिरपूर येथील बाजारपेठेत दुपारी ३ वाजेनंतर सामसूम दिसून आली. शिरपूर परिसरात मोठ्या संख्येने परराज्य, परजिल्ह्यातून मजूर, कामगार येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका नको ्म्हणून प्रत्येकजण दक्षता घेत असल्याचे शिरपूर परिसरात दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार