शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी घेवून स्वबळावर ‘महेश’ झाला ‘डॉक्टरेट’!

By admin | Updated: February 16, 2017 21:25 IST

अतिशय हलाखीची परिस्थिती त्यातही शिक्षणाची आवड असलेल्या महेशने स्वबळावर पीएचडी करुन डॉक्टरेट होण्याचा बहुमान मिळविला.

ऑनलाइन  लोकमत 
वाशिम, दि. 15 -  अतिशय हलाखीची परिस्थिती त्यातही शिक्षणाची आवड असलेल्या महेशने स्वबळावर पीएचडी करुन डॉक्टरेट होण्याचा बहुमान मिळविला.  स्वत:ची परिस्थिती हलाखीची असतांनासुद्धा शिकवणी घेवून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून स्वत:चे उच्चशिक्षण पूर्ण केले. हे करीत असतांना वर्गातील अनेक गरिब व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देवून स्वखर्चातून त्यांची राहण्याची, खाण्याची व शिक्षण पूर्ण करण्याची व्यवस्था केली. आज त्यांनी मदतीचा हात दिलेले अनेक विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये, कॉलेजसमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
मालेगाव तालुक्यातील छोटेसे गाव किन्हीराजा येथील महेश रामचंद्र तांदळे यांची जेमतेम परिस्थिती. अभ्यासात हुशार असल्याने मिळणाºया शिष्यवृती व त्याला हातभार म्हणून विद्यार्थ्यांच्या शिकवणीतून त्यांनी आपले स्वताचे शिक्षण पूर्ण केले. स्वताची परिस्थिती पाहता असे अनेक विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या परिस्थितीतून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी यावेळी त्यांना आपल्या भाडयाच्या खोलीत राहण्यासाठी जागा, जेवणाच्या डब्याची व्यवस्था व वेळेप्रसंगी त्यांना लागणारे शालेय साहित्य पुरवून उच्चशिक्षीत केले. आज यातील काही विद्यार्थी अनेक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर काही विविध कंपन्यांमध्ये उच्चपदावर नोकरी करीत आहेत. आजही त्यांच्या खोलीमध्ये अनेक विद्यार्थी मोफत राहून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. महेश तांदळे यांना नुकतेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्याकडून प्राणीशास्त्र विभागामध्ये ‘प्लॅनकटॉन डिव्हरसिटी अ‍ॅन्ड युरिट्रॉफीकेशन स्टेटस आॅफ लोणार क्रिएटर इंडिया’ या विषयावर डॉक्टरेट मिळविली. त्यांना यासाठी राजस्थान कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. डी.एस. दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.  
माझ्या शिक्षणासाठी मला करावे लागलेले ‘स्ट्रगल’ पाहिले की तसे विद्यार्थी दिसल्याबरोबर मी त्यांना सहकार्य करतोय. आज त्यांचाच आर्शिवाद आहे हा जो मला ‘डॉक्टरेट’ मिळाली.
- डॉ. महेश रामचंद्र तांदळे