शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी झाल्यानंतर जिल्ह्यातील १०११ अंगणवाडी सेविकांना ‘भाऊबीज’ भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:06 IST

Washim News प्रत्येकी दोन हजार रुपये असा एकूण ४१ लाखांचा निधी शासनाकडून जिल्हा परिषदेला दिवाळीनंतर मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून यंदा प्रत्येकी दोन हजार रुपये असा एकूण ४१ लाखांचा निधी शासनाकडून जिल्हा परिषदेला दिवाळीनंतर मिळाला. हा निधी आता १०११ अंगणवाडी सेविका, ६५ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९९४ मदतनिसांना दिला जात आहे. दरवर्षी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाकडून दिवाळीदरम्यान भाऊबीज भेट दिली जाते. यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निणर्य शासनाने घेतला. कोरोना काळात बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येइल असे महिला व बालविकास विभागातर्फे सांगण्यात येत होते. परंतू, शासनाकडून निधी वेळेवर मिळाला नसल्याने ही भाऊबीज भेटही दिवाळीनंतर मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी आहेत. येथे कार्यरत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी जिल्हास्तरावरून तालुकास्तरीय सहा प्रकल्प कार्यालयांना ४१ लाखाचा निधी वितरीत करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम