शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

पाणीटंचाई निवारणार्थ  प्रशासनाची चाचपणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:29 IST

वाशिम: यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य  पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या  माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद  अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा घेऊन  पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना  सोमवारी संबंधित यंत्रणेला केल्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अहवाल सादर करण्याच्या सूचना 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य  पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या  माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद  अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा घेऊन  पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना  सोमवारी संबंधित यंत्रणेला केल्या.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही.  पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक  जलसाठा होऊ शकला नाही. ग्रामीण भागात तर आतापासूनच  विदारक परिस्थिती आहे. जिल्हय़ात एकूण ४९१ ग्रामपंचायती  असून, जानेवारीपासून नेमक्या किती गावांत पाणीटंचाई जाणवू  शकते, याचा अंदाज जिल्हा परिषद प्रशासनातर्फे बांधला जात  आहे. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उ पाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना,  किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे,  बोअरवेलची परिस्थिती कशी आहे, हातपंप दुरुस्ती, वीज  देयकाचा भरणा न केल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना,  किती गावांत टँकरची गरज आहे, आदींसंदर्भात ग्रामपंचायतींनी  आतापासूनच नियोजन करून पंचायत समितीच्या माध्यमातून  जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात  आल्या. ग्रामपंचायतींचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर टंचाईग्रस्त  गावांची संख्या समोर येणार आहे.ग्रामीण भागात विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने  हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईचे संकट घोंघावण्याची शक्यता  नाकारता येत नाही. हिवाळय़ापासून किती गावांत पाणीटंचाई  निर्माण होऊ शकते, याचा अंदाज बांधून तसेच संभाव्य  पाणीटंचाई लक्षात घेता पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतींनी  चाचपणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याच्या सूचना  देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी  प्रशासकीय आढावा घेऊन पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात  कुणाचीही हयगय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने जलयुक्त  शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या  गावातही यावर्षी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात  आहे. अशा गावांमध्ये टँकरसाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर  केल्यास, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना  राबविणे आवश्यक ठरते. गतवेळचा अनुभव बघता, काही ग्राम  पंचायतींनी टँकरचे प्रस्ताव पाठवूनही जिल्हा प्रशासनाने त्याला  मंजुरी दिली नव्हती. या प्रकाराची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये,  अशी अपेक्षा टंचाईग्रस्त गावातील नागरिक बाळगून आहेत. 

विहीर, बोअरवेल अधिग्रहणावर भरपाणीटंचाई निवारणार्थ संबंधित गावात विहीर व बोअरवेल  अधिग्रहण करण्यावर भर दिला जात आहे. अधिग्रहण केल्यानं तर संबंधित विहीर किंवा बोअरवेलच्या ठिकाणी ‘अधिग्रहित  विहीर’ असा फलकही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषद