शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तूर मोजणीसाठी प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:45 IST

वाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देचार दिवसांत केवळ साडेसहा हजार क्विंटल तूर मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जिल्ह्यात २६ जुलैपासून तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु मागील चार दिवसांत ६ केंद्रावर मिळून ३७५ शेतकºयांची मिळून केवळ ६ हजार ६९४ क्विंटल तुरीची मोजणी प्रशासनाला शक्य झाली आहे. प्रशासनाची तूर मोजणीसाठी कसरत होत असून, मोजणी संथगतीने होत असल्यामुळे शेतकºयांना खरिपाच्या हंगामात शेतीवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात ३१ मेपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांपैकी १४ हजार ५४२ शेतकºयांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर मोजणी बाकी होती; परंतु या शेतकºयांची तूर मोजणी होण्यापूर्वीच शासनाने शासकीय खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधी पक्षांसह शेतकºयांच्यावतीने या संदर्भात वेगवेगळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार शासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तूर मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर मोजून घेण्याचा निर्णय २३ जुलै रोजी जाहीर केला.त्या निर्णयातील सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत टोकनधारक शेतकºयांकडे असलेली शिल्लक तुरीची पडताळणी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि गट सचिवाचा समावेश असलेले पथक सहाही तालुक्यात नियुक्त केले. त्या पथकाच्या तपासणीनुसार २६ जुलैपासून जिल्ह्यातील मालेगाव, वाशिम, कारंजा आणि अनसिंग या चार ठिकाणी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासकीय तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी मंगरुळपीर आणि रिसोड येथेही ही खरेदी सुरू करण्यात आली; परंतु मागील चार दिवसांत सहाही केंद्रांवर मिळून केवळ ३ हजार ७६७ क्विंटल तूर या केंद्रांवर मोजण्यात आली. आता खरिपाच्या हंगामात शेतकºयांना शेतीकडे लक्ष देणे आवश्यक असताना तूर मोजणीला विलंब लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.अद्यापही जिल्ह्यात १४ हजार ३२९ टोकनधारक शेतकºयांची २ लाख ८० हजार ७६९ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. या तुरीच्या मोजणीला विलंब लागणार असल्याने शेतकºयांना खरीप हंगामातील पिकांची देखभाल करणे, थकीत कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणे, तसेच पीक विमा उतरविण्याची कामे करणे कठीण झाले आहे. त्यातच पीक विमा भरण्याची मुदत ३१ जुलै असल्याने अनेक शेतकºयांची पंचाईत झाली आहे. तूर मोजणी केंद्रावर थांबावे, पीक कर्जमाफीसाठी अर्ज सादर करावा की शेतीकडे लक्ष द्यावे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहेत.मुदतवाढीचा टोकनधारक शेतकºयांना आधारशासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकºयांची तूर मोजण्यासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. तथापि, केवळ सात दिवसांत शिल्लक राहिलेली पावणे तीन लाख क्विंटलच्यावर तूर मोजून घेणे कठीण असल्याने विविध स्तरावरून शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. शासनाने याबाबीचा सारासार विचार करून टोकनधारक शेतकºयांच्या शिल्लक राहिलेल्या तुरीच्या मोजणीसाठी आता ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे टोकनधारक शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.शासनाच्या निर्णयानुसार टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घ्यावी लागणार आहे. तूर पडताळणीसाठी नियुक्त केलेले पथक शेतकºयांकडून माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहे. मर्यादित मनुष्यबळापोटी सद्यस्थितीत तूर मोजणी वेगात होऊ शकली नाही; परंतु निर्धारित मुदतीच्या खूप आधी जिल्ह्यातील सर्वच टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घेतली जाईल.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम