शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांना आधार लिंकींग प्रक्रिया पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:41 IST

वाशिम जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत. दरम्यान, शनिवार, २२ फेब्रूवारीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांना आधार लिंकींग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवार, २४ फेब्रूवारीपासून पात्र शेतकºयांच्या याद्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.सहकार विभागाच्या नियंत्रणाखाली वाशिम जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेकरिता राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँका निवडण्यात आल्या आहेत. दरम्यान, १ फेब्रूवारी २०२० पासून स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करून त्याव्दारे संबंधित बँकांना शेतकºयांची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत ‘अपलोड’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याची चोख अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध बँका आणि १०९३ आपले सरकार सेवा केंद्रांवर बायोमेट्रीक पद्धतीने कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करण्यात आली. त्यासाठी प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना पुरेसे बायोमेट्रीक उपकरणे देखील उपलब्ध करून दिली होती. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी आपापल्या स्तरावर बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध केली. तथापि, बायोमेट्रीक पद्धतीने आधार क्रमांकांची पडताळणी आणि कर्जखात्यांना आधार लिंकींग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता २४ फेब्रूवारीपासून संबंधित पात्र शेतकºयांच्या याद्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करून शासनाच्या पुढील निर्देशानंतर शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी दिली.१ एप्रिल २०१५ पुर्वी कर्ज घेतलेले शेतकरी अपात्रमहात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ नंतरच्या थकबाकीदार शेतकºयांनाच २ लाखांपर्यंतच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. त्यापुर्वी कर्ज घेतलेले शेतकरी अपात्र ठरले आहेत. अशा शेतकºयांकरिता शासनाने ‘कृषी किरण’ नावाची योजना अंमलात आणली असून बँकांमार्फत त्याचा प्रचार-प्रसार केला जात असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या केली जात आहे. याअंतर्गत शेतकºयांच्या आधारची बायोमेट्रीक पद्धतीने पडताळणी आणि कर्जखात्यांना आधार लिंकींगची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता संबंधित पात्र शेतकºयांच्या याद्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी