रिसोड (जि. वाशिम) : तालुक्यातील रिठद, धोडप, वसरपखेड या क्षेत्रामधील वाळू घाटातील अवैध गौण खनिज उपसाप्रकरणी सहा वाहनधारकांवर कारवाई करुन एक लाख तीन हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली . प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील १५ रेतीघाटापैकी ४ घाटाचा लिलाव झाला असून, ११ रेतीघाटावर अवैध वाळू उपसा होत असून, याबाबत गुप्त माहिती मिळताच तहसीलदार अमोल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख नायब तहसीलदार सुनील सावंत यांनी सदर वाहनधारकावर दंडात्मक कारवाई केली. तालुक्यामध्ये अवैध वाळू माफीयावर कारवाईचे सत्र सुरु आहे. या वर्षात ९ लाख रु दंड वसूल करण्यात आला आहे. अवैधरीत्या गौण खनिज उपसा करणार्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची मािहती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली आहे. अवैध गौण खनिज शोध भरारी पथकामध्ये एस.बी.जाधव जाधव, जी.जी.गरकळ, मंडळ अधिकारी मोरे, तलाठी बायस्कर, लहाने, बैतुले, डुकरे यांचा समावेश आहे.
अवैध गौण खनिज उपसाप्रकरणी सहा वाहनधारकांवर कारवाई
By admin | Updated: February 14, 2015 02:03 IST