शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी

By admin | Updated: May 24, 2017 01:52 IST

परस्परविरोधात तक्रार : आठ जणांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जागा व शेतीच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांत असलेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये राहणाऱ्या या सख्ख्या दोन भावांच्या कुटुंबात मंगळवारी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, दोन्ही गटाकडील एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.वैभव सोहन गायकवाड याने मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की, २३ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्याचे वडील-आई आणि मोठा भाऊ दीपक घरी बसलेले असताना, त्याचे मोठे काका अरविंद नामदेव गायकवाड, त्यांची पत्नी मथुराबाई, त्यांची दोन मुले अमोल व सतीश रा. केशवनगर तालुका रिसोड यांनी घराचे कुलूप तोडले. घराचे कुलूप का तोडले, असं विचारले असता, चुलतभाऊ अमोल याने लोखंडी रॉडने मारहाण केली, तर सतीशने धरले. रॉडने डोक्यावर मारून जखमी केले तर चौघांनी शिवीगाळ करीत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अरविंद नामदेव गायकवाड, मथुराबाई अरविंद गायकवाड, अमोल अरविंद गायकवाड व सतीश अरविंद गायकवाड यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गटाकडून अरविंद नामदेव गायकवाड यांनी फिर्याद दिली की, ते मालेगावला त्यांच्या वडिलांच्या घरी आले असता, त्यांचा भाऊ सोहन नामदेव गायकवाड, ज्योती सोहन गायकवाड, वैभव सोहन गायकवाड व दीपक सोहन गायकवाड यांनी शिवीगाळ केली. दीपकने तलवार हाताच्या अंगठ्यावर मारून जखमी केले. या फिर्यादीवरून उपरोक्त चौघांविरूद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.