शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य दुकानांसदर्भातील तक्रारींच्या निपटाऱ्यास सर्वोच्च प्राधान्य- राजेंद्रसिंग जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:48 IST

जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. या दरम्यान शासनाने पात्र लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वितरीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सुरूवातीच्या काळात अंगठा पद्धतीला दुकानदारांचा विरोध, त्यानंतर नियमाचे उल्लंघन, दुकानांसमोर लाभार्थींच्या रांगा, स्थलांतरीत तसेच शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण , तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरारी पथकाचे गठण आदीसंदर्भात  जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..

लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात लाभार्थींवा अंगठा घेण्याच्या पद्धतीला रेशन दुकानदारांचा विरोध होता. सदर प्रकरण कसे हाताळले?कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लाभार्थींचे अंगठे घेण्याला रेशन दुकानदारांचा राज्यभरातच विरोध होता. अंगठे न घेता धान्य वितरणाला परवानगी मिळाल्याने हा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला. रेशन दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागू नये आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे याकरीता शिक्षकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

 प्राधान्य गटातील किती लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वाटप सुरू आहे?प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून महिन्याचे मोफत तांदळाचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यात प्राधान्य गटात १ लाख ७७ हजार तर अंत्योदय गटात जवळपास ४८ हजार शिधापत्रिकाधारक आहेत.

अनेक दुकानदार नियमांचे पालन करीत नाहीत, याबाबत काय सांगाल?नियमांचे पालन न करणाºयावर कारवाईची मोहिम सुरू आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एकूण २४ दुकानांविरूद्ध कारवाई केली. यामध्ये १२ दुकाने रद्द, दोन दुकाने निलंबित, १० दुकानांची अनामत जप्त करून सुधारणा करण्याची ताकीद दिली. नियमाचे पालन प्रत्येक दुकानदाराने करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा होतो काय?रेशन धान्य वितरण व रेशन दुकानासंदर्भात लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकाचे गठण करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारीनुसार पडताळणी करून दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाते. आतापर्यंत या पथकाकडे २४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दोषी आढळून आलेल्या दुकानदारांविरूद्ध कारवाईदेखील करण्यात आली आहे.

स्थलांतरीत तसेच शिधापत्रिकाधारक नसलेल्या लाभार्थींना मोफत तांदूळ व दाळ वितरीत करण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत. स्थलांतरीत, शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचा आकडा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले. जिल्ह्यात ७९३ कुटुंबातील १४ हजार २९१ नागरीक आहेत. या नागरिकांनादेखील मोफत तांदूळ व दाळ वितरणाचा लाभ दिला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत