अमरावती परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहर व ग्रामीण भागातील कोळी फाटा, जयस्तंभ चौक मधील दोन ठिकाणी तसेच बायपास परिसरातील एका हाॅटेलवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडी टाकून यांच्याकडून अंदाजे २५ मोटार सायकली तर काही रक्कम व ४० व्यक्तीना जुगार खेळताना रंगेहाथ पकडून कार्यवाही करण्यात आली. तर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी केलेल्या दुसऱ्या कार्यवाहीत कारंजा शहरातील ईगल कॅन्फक्शनरी व धनश्री कॅन्फक्शनरी या ठिकाणी धाडी टाकून यांच्या दुकानातून अनुक्रमे १ लाख २५ हजार ४०० रुपये तर दुसऱ्या ठिकाणी २३ हजार रुपयाचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. या मध्ये तीन आरेापींना ताब्यात घेण्यात आले. या कार्यवाहीत वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार शिवा ठाकरे, ए.एस. आय पठाण, अमोल इंगोले, नीलेश इंगळे, संतोष सेनकुडे, प्रशांत राजगुरू, अश्विन जाधव, संदीप डाखोरे यांनी सहकार्य केले. या कारवाईमुळे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची वाशिम कंट्रोल रूम येथे बदली झाल्याची माहिती आहे.
कारंजात दोन ठिकाणी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST