शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

आरोपीवर पोलिसांची मेहरनजर

By admin | Updated: May 22, 2014 23:34 IST

कोटयवधी रूपयांचे खत जप्त प्रकरण: आर्थिक देवाण-घेवाणची चर्चा

वाशिम : खताची साठेबाजी करून व बोगस बियाणे विक्री करून शेतकर्‍यांना फसवू पाहणार्‍या विजयकुमार दागडीया यांच्यावर पोलीसांनी तीन दिवसापूर्वी गुन्हा दाखल केला. मात्र या आरोपीला पोलीसांनी अद्यापही अटक न केल्याने सदर प्रकरणात आर्थीक देवाण घेवाण केल्याची चर्चा शहरभरात रंगत आहे. वाशिम येथील विजयकुमार दागडीया यांच्या काटा रोडवरील गोडावून मध्ये मोठया प्रमाणात रासायनिक खताचा अनाधिकृत साठा कृषी विभागाच्या विशेष पथकाला आढळून आला. या पथकाने एक कोटी ६८ लाख ४५ हजार रूपये किमंतीचा खत साठा जप्त केला. प्राप्त माहितीनुसार विजयकुमार भगवानदास दागडीया हे कोरोमंडल इंटरनॅशनल लि. या खताच्या कंपनीचे हॅन्डलींग अँन्ड ट्रान्सपोर्ट एजन्ट आहे. त्यांच्या पंचाळा व काटा रोडवरील गोदामवर कृषी अधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यामध्ये ८५ लाख रूपयांचा ५२४ मॅट्रीक टन रासयनिक खत आढळून आले. तपासणी केल्यानंतर खत नियंत्रण आदेश १९८५ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे ८५ लाख रूपयांच्या ५२४ मॅट्रीक टन खतासाठी विक्री बंदचे आदेश देण्यात आले ही कारवाई गुणनियंत्रण कायदयाअंतर्गत करण्यात आली. त्यानंतर शासन परवाना नसलेल्या काटा रोडवरील गोदामची तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी एक कोटी ६८ लाख ४ ५ हजार रूपये किमंतीचे ८८४ मॅट्रीक टन खत आढळून आले. एवढा मोठा खत साठा जप्त करण्यात आल्यानंतर खताची साठेबाजी करणार्‍याचे धाबे दणाणून गेले. जीवनावश्यक वस्तू कायदयानुसार व इतर अनेक कायदयान्वये दागडीया यांच्याविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. शेतकर्‍यांच्या जीवाशी खेळ करू पाहणार्‍या दागडीया यांना अटक करण्यासाठी पोलीस दिरंगाई करीत असल्याने यामध्ये आर्थीक देवाण घेवाण झाल्याची चर्चा संतप्त शेतकर्‍यांमध्ये होत आहे. इसीए कायदाअंतर्गत गुन्हा सिध्द झाल्यास दागडीया यांना जामिन मिळणे कठीण तर होईलच शिवाय सात वर्षाच्या शिक्षेची कायदयात तरतूद आहे. इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतांनाही सदर आरोपी गावामध्ये राजरोसपणे फिरत असून पोलीसांच्या नजरेत आरोपी पसार असल्याचे समोर येत आहे. या आरोपीला वाचविण्यासाठी हैद्राबादस्थित कोरोमंडलच्या अधिकार्‍यांसह व्यापार्‍यांनी पोलीसांसोबत सेटींग करण्यासाठी फिल्डींग लावली आहे. शहरातील काही प्रतिष्ठीत व्यापार्‍यानी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची भेट घेवून उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी पोलीसांचा ह्यसेह्ण दागडीया व कोरोमंडल अधिकार्‍यांसाठी पूरक असावा जेणेकरून त्यांचा तात्काळ जामिन व्हावा अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर सायंकाळी एका गुप्त ठिकाणी फरार असलेले दागडीया, कोरोमंडल अधिकारी आणि व्यापारी यांच्यात बैठक होवून मोठया रकमेची सेटींग झाल्याची माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या दागडीया अँन्ड कंपनीला पोलीसांनी पाठबळ दिल्याने शेतकर्‍यांचा वाली कोणीच उरला नाही.