मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव- मेहकर महामार्गावर मेहकर कडे पायी जात असलेल्या युवकाला टिप्परने जबर धडक दिली. यामध्ये कमरेवरुन मागील चाक गेल्यामुळे युवक जागीच ठार झाल्याची घटना १९ मार्चला दुपारी ३.३0 वाजता घडली. वडप येथील राहणारा पंडित यादवराव गायकवाड वय ३५ वर्ष हा औरंगाबाद येथे खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता. धरणात शेती गेल्यामुळे काही दिवसात त्या शेतीचा मोबदला शासनाकडून प्राप्त होता त्याच कारणास्तव वाशिम येथून आपले काम आटपून वडप आपल्या गावी परत जात असताना सोसायटी पेट्रोल पंपाजवळ मागून भरधाव वेगाने मुरुमने भरलेला टिप्पर क्रमांक एम.एच. २९ - ९३६८ ने सदर युवकाला धडक दिली. यामध्ये युवक चाकाखाली येवून त्याच्या अंगावरून चाक गेले. ही घटना घडल्याबरोबर वाहन चालक घटनास्थळावरुन फरार झाला. युवकाला शवविच्छेदन करण्यात करिता ग्रामीण रुगणालयात पाठविण्यात आले. यावेळी वाहतूक खोळंबली होती ती सुरळीत करण्यात आली.
अपघातात युवक जागीच ठार
By admin | Updated: March 20, 2015 00:57 IST